‘पॉप्युलर बुक हाऊस’ (PBH) बंद करावं लागतंय…
व्यवसायात राहूनदेखील आम्ही कधी कोणाशी ‘स्पर्धा’ केली नाही. ग्राहक कायम खूष आणि संतुष्ट कसे राहतील याकडे आम्ही जास्त लक्ष दिलं. पण .... परिस्थिती बदलली... आवड बदलली, प्रायोरिटीज बदलल्या आणि एक वेळ अशी आली की, ‘पॉप्युलर बुक हाऊस’ बंद करावं लागणार या कटू सत्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही मनाची तयारी केली… ‘पॉप्युलर बुक हाऊस’ (PBH) लवकरच आपला निरोप घेईल.......